March 30, 2026
धनदांडग्यां विरोधात गरीब मूळ ओबीसी न्याय हक्कासाठी राजाराम दगडे पाटील यांची लढाई निश्चित

धनदांडग्यां विरोधात गरीब मूळ ओबीसी न्याय हक्कासाठी राजाराम दगडे पाटील यांची लढाई निश्चित

भरारी न्युज वृत्तसेवा 

पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या समजले जाणाऱ्या लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामध्ये मूळ ओबीसी असणाऱ्या राजाराम दगडे पाटील यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून या मतदारसंघातील मूळ ओबीसी म्हणून दगडे पाटील निवडणूक लढवणार आहेत,

या मतदारसंघांमध्ये इतर मागासवर्गीय पुरुष असे आरक्षण निघालेले असताना रथी महारथी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, परंतु ही जागा मूळ ओबीसीलाच सुटल्याने ओबीसी वर अन्याय होऊ नये म्हणून राजाराम दगडे पाटील यांनी लढा पुकारला आहे,

दगडे पाटील यांचे कार्य पाहता त्यांनी समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून समाजकार्य केले आहे, त्यामुळे ओबीसी समाजासाठी दगडे पाटलांच्या कार्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे, मतदार संघात ओबीसी समाज जागा आहे की झोपला आहे एकंदरीत या निवडणुकीमध्ये हे समजणार आहे असे मल्हार बहुजन सेनेचे संस्थापकीय अध्यक्ष राजाराम दगडे पाटील यांनी सांगितले,