दगडखाण कामगाराना जमीनीसह घर देण्याचे आश्वासनानंतर ॲड.रेगे आणि दगडखाण कामगारांचा सत्याग्रह मागे.
सुनील भंडारे पाटील
वाघोलीतील वाघेश्वर नगर (ता हवेली) येथे गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या दगडखाण कामगारांच्या मागणीला महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी हिरवा कंदील दाखविल्यामुळे एडवोकेट बीएम रेगे सह डबल खान कामगारांनी उपोषण मागे घेतले आहे,
पुणे महानगरपालिका येथील आयुक्त नवल किशोर राम , अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये दगडखान कामगारांना आहे त्या जागेवर पुणे महानगरपालिकेकडून घर बांधून देणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय आज देण्यात आल्यामुळे आज जेष्ठ समाजसेवक आणि हमाल पंचायत चे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव यांच्या हस्ते मोसंबी ज्यूस पिऊन सर्व उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले आहे,
याप्रसंगी डॉ बाबा आढाव,नितीन पवार रामभाऊ दाभाडे,वसुंधरा उबाळे, शिवदास उबाळे, जयश्री सातव, मीना सातव, हीरा वाघमारे,शांताराम कटके,अर्चना कटके,मेजर तुकाराम डफळ असे वाघोलीतील सर्व भावी नगरसेवक एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
