एक गुंठा नव्हे तर प्रॉपर्टी कार्डच देणार..तहसीलदार तृप्ती कोलते
दिवाळीच्या सुट्टीत अन्नत्याग सत्याग्रहस्थळी भेटून दिले आश्वासन

सुनील भंडारे पाटील
गेल्या 30 वर्षापासून दगडखाण कामगार आणि आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी दगडखाण कामगार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अँड. बी एम रेगे आणि संतुलन संस्थेच्या संचालिका अँड. पल्लवी रेगे यांचा संघर्ष सुरू आहे,
मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत वाघेश्वर नगर येथे चालू असलेला बेमुदत अन्न त्याग उपोषण गेल्या सात दिवसापासून सुरू असून अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी भर दिवाळी सणाच्या दिवसी व सुट्टी असतानाही सत्याग्रह स्थळी भेट देऊन अन्नत्याग सत्याग्रह मागे घेण्याबाबत विनंती केली.
जिल्हाधिकारी यांच्याशी दि. २४ ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित केली असून या बैठकीमध्ये दगडखाण कामगारांना व अदिवासींचा सातबारा अर्थात प्रॉपर्टी कार्ड निश्चित देऊ असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले आहे.

जो पर्यत शासन निर्णया नुसार ठोस अमलबजावणी होत नाही तो पर्यन बेमुदत अन्न त्याग सत्याग्रह थांबणार नाही असा सर्वांचा ठाम निर्णय असल्याचे अँड. बी. एम रेगे यांनी सांगितले.

नगरसेवक शांताराम बापू कटके, स्टार महाराष्ट्रचे संपादक अशोक घावटे, खराडी भागातून बेबी बोकले, संजय गायकवाड, यशवंत खरोटे, सुरेखा गायकवाड, कांताबाई करोटे आदींनी सत्याग्रहाला जाहीर पाठिंबा दिला. मोठ्या संख्येने दगडखाण कामगार व अदिवासी सातव्या दिवशी संपामध्ये सहभागी झाले होते.

