March 30, 2026
सत्याग्रहात दगडखाण कामगारांचा आक्रमक होण्याचा निर्धार-जिल्हाधिकाऱ्याना लिखीत इशारा

सत्याग्रहात दगडखाण कामगारांचा आक्रमक होण्याचा निर्धार – जिल्हाधिकाऱ्याना लिखीत इशारा. 

सुनील भंडारे पाटील

वाघोली (तालुका हवेली) येथे चालू असेलेल्या बेमुदत अन्न त्याग सत्याग्रहाच्या तिसऱ्या दिवसी मोठ्या संख्येने दगडखाण सत्याग्रहात सहभागी झाले.

शासन व प्रशासनाने गायराणात राहणाऱ्या कुंटुंबांच्या नावे ७/१२ करण्याचा निर्णय होईपर्यंत सत्याग्रह चालूच राहील दरम्यान सत्याग्रहीतांची प्रकृती खालावत असल्याने शासन व प्रशासनाने मागण्यामान्य केल्या नाही तर दाडखाण कामगार तिर्व आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना आज दिला आहे.

सत्याग्रहाच्या ठिकाणी वाघोलीचे मंडळाधिकारी सरतापे मॅडम, तलाठी गोकूळ भगत, शिवाजी भंडलकर आदिंनी आंदोलन स्थळी भेट देऊन मागण्यावर सविस्तर चर्चा केली व वरिष्टांकडे मागण्या घेऊन जाण्याचे आश्वासन दिले.

सत्याग्रहाला माजी सैनिक तुकाराम ढफळ. पुणे ऑटो रिक्षा चालक मालक समुह, राजेश्री राजेंद्र सातव पाटील, राष्ट्र सेवा संघाचे विकास वीर व सहकारी यांनी जाहीर पाठिंबा दिला.

पंचवीस उपोषण करते व पाचशे हून अधिक दगडखाण कामगारांनी सत्याग्रहात सहभाग घेतला. आंबादास साळुंखे, शिवाजी मोहीते, सुनिल हतागळे, शिवाजी पात्रे, नितीन हतागळे, बाळु धोत्रे, सचिन साठे, महादेव मंजुळे, राजू माने, संजय शिवशरन, शरद माने, संतोश माने, यल्लाप्पा पवार, बालाजीप दंडगुले, रईज शेख, विकास धोत्रे, दावीद इंचाळ, शिवाजी दंडगुले, रोहीदास गायकवाड आदिंनी उपोषण आंदोलनामध्ये सहभाग घेतला ,