शेतकरी कृती समितीच्या लढ्याला अभूतपूर्व यश
सुनील भंडारे पाटील
हवेली तालुक्यातील मांजरी पासून – हिंगणगाव पर्यंत मुळा – मूठा नदि लगतच्या कृषिपंपांना वॉटर मीटर लावून ड्रेनेज . सांडपाण्यावर भरमसाठ पाणी पट्टी वसूल करण्याची मोहीम पाटबंधारे विभागाने राबण्याची मोहीम हाती घेतली होती
या विषयाला विरोध करण्यासाठी मीटर हटाव – शेतकरी बचाव कृती समिती स्थापन करून लढा देणाचे सर्व शेतकऱ्याचे ठरले वरून सर्व कायदेशिर पूर्तता करून मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन 22 गावातील शेतकऱ्यांनी दाखल केले होते .
या विषयावर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय झाल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी लवकरच शेतकरी मेळावा दोन तीन दिवसात घेऊन काय निर्णय झालाय या बाबत चर्चा होऊन मार्गदर्शन होईल
तारीख वेळ ठिकाण लकरच कळविण्यात येईल
त्यावेळी सर्व नदी काठच्या कृषिपंप धारकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अंकुश कोतवाल (सचिव) – मीटर हटाव – शेतकरी बचाव कृति समिती हवेली तालुका यांनी केले आहे.
