वाघोलीत गंभीर अपघात महिलेचा मृत्यू वाहतूक पोलिसांचा हलगर्जीपणा
सुनील भंडारे पाटील
वाघोली (तालुका हवेली) पुणे नगर रोडवर वाहतूक पोलिसांचा बेजबाबदारपणा रोजच्या रोज जीव घेतोय, वाघोली येथील पुणे नगर महामार्गावर
वाघेश्वर चौकात पुन्हा अपघात एका महिलेचा मृत्यू, अवैध स्वरूपाचे डंपर याला वाहतूक पोलिसांचा आशीर्वाद,
लहान मोठ्या वाहन चालकांना शिस्त कधी लागणार बेशिस्तीमुळे घडत आहेत, अपघात आणि त्याची किंमत सामान्य नागरिकांनी मोजायची? हा कुठला न्याय असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे ,वाघेश्वर चौकात डंपरच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू याला जबाबदार कोण? फक्त आणि फक्त वाघोली वाहतूक पोलिस अधिकारी! असा आरोप जनतेतून होत आहे,
करीम चांद शेख (अध्यक्ष वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ , अल्पसंख्यांक व सोशल मीडिया विभाग पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी) यांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यांपासून वाहतूक व्यवस्थेबाबत लढा देतोय, पण पुणे वाहतूक शाखेचे कनिष्ठ व वरिष्ठ अधिकारी “कानावर हात” ठेवून गप्प! उलट त्रयस्थ लोकांकडून धमक्या म्हणजे पोलिसांचे आशीर्वादच आहेत असं दिसतंय…!
पुढे त्यांनी सांगितले की ,जर मृत्यूचं मोजमाप आणि गुन्ह्याची नोंद हीसुद्धा दाद-निवाड्याच्या फाईलमध्ये दडवली जाणार असेल, तर मग हे अधिकारी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहेत की मृत्यूला आमंत्रण देण्यासाठी? प्रत्येक मृत्यूला जबाबदार वाघोली वाहतूक पोलिस अधिकारी आणि यांच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे..! असे शेख यांनी बोलताना सांगितले
पुणे नगर महामार्ग वाढती वाहतूक लहान मोठ्या वाहनांचा चालकांचा बेशिस्त पणा यामुळे आतापर्यंत अनेक नागरिकांचा मार्गावर वाघोली मध्ये जीव घेतला आहे, अजून किती जीव घेतल्यानंतर प्रशासनाला व शासकीय यंत्रणेला तसेच पुणे वाहतूक विभागाला जाग येईल , ही खूप गंभीर बाब आहे, पुणे वाहतूक शाखेने यावर तातडीने उपाययोजना करून पुढील काळात होणारे अपघात थांबवावे अशी मागणी वाघोलीकर व प्रवासी करत आहेत,
