Homehaveliधर्मवीर संभाजीराजे विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात 

धर्मवीर संभाजीराजे विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात 

धर्मवीर संभाजीराजे विद्यालयातशिक्षक दिन उत्साहात

सुनील भंडारे पाटील

तुळापूर (तालुका हवेली) येथील धर्मवीर संभाजीराजे माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या दिवशी, विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या भूमिकेचा अनुभव मिळावा यासाठी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी अध्यापनाची जबाबदारी स्वीकारली. यात श्रेयस शिवले आणि संस्कृती शिवले यांनी मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व अधिक जवळून समजले.

यावेळी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सन्मान केला. शिक्षकांना केवळ पुष्पगुच्छ न देता, तुळशीचे रोप देऊन त्यांचा आदर करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या भेटीने शाळेतील वातावरण भावूक झाले होते.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या श्रीमती गायत्री मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षकांचे समाजातील स्थान किती महत्त्वाचे आहे, हे सांगितले. “शिक्षक केवळ ज्ञान देणारे नसतात, तर ते विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवणारे शिल्पकार असतात,” असे त्यांनी म्हटले.

शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर, सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि उपस्थित पाहुण्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि शिक्षकांप्रति असलेल्या आदराचे सर्वांनी कौतुक केले. या संपूर्ण कार्यक्रमात आनंद, उत्साह आणि कृतज्ञतेची भावना दिसून आली.

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!