पुणे जिल्हा प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. विधानसभेला अवघे ३ महिने शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सुद्धा राज्यात महा विकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना पाहायला मिळणार असला तरी चर्चेच्या केंद्रस्थानी राहतील ते म्हणजे शरद पवार राष्ट्रवादीतील फुटी नंतर हि पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने शरद पवार नेमका काय डाव टाकणार? आपल्या पक्षाला पुन्हा एकदा नवी उभारी कशी देणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य आहे. कोणत्याही क्षणी डाव पलटविण्याची ताकद व क्षमता ही शरद पवारांकडे असल्याने आजही भलेभले त्यांना दचकून असतात आता सुद्धा शरद पवार यांच्याकडे म्हणावे तसे आकडे नाहीत. अजित पवारांच्या बंडा नंतर जमतेम १२-१३ आमदार शरद पवारां सोबत आहेत.
त्यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह सुद्धा निवडणूक आयोगाने काढून घेतलं आहे. मात्र तरीही लोकसभे प्रमाणेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा पवारांची तुतारी दणक्यात वाजू शकेल असं बोललं जातंय. पवार पुन्हा आपली पॉवर दाखवू शकतील का? त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेत पुन्हा एकदा मुसंडी मारू शकतो का ? हे आपण जाणून घेऊयात.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून हा पक्ष जास्तीत जास्त काळ सत्तेत राहिलाय. शाहू- फुले- आंबेडकरांचा विचार जपणारा आणि शेतकरी कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार हा पक्ष, आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात महत्वाची खाती सांभाळली आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेशी चांगलीच नाळ सुद्धा जोडली हा इतिहास आहे. १९९९ मध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला ५८ जागांवर यश मिळालं. त्यानंतर २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक ७१ जागा जिंकता आल्या. २००९ सालच्या विधानसभेला पुन्हा ६२ आमदार राष्ट्रवादीने निवडून आणले.
या तिन्ही निवडणुकांनंतर पक्षाने राज्यातील सत्ता आपल्या हातात ठेवली. मात्र २०१४ ला भाजप- शिवसेनेचे सरकार आलं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला 41आमदाराना निवडून आणता आलं. २०१९ मध्ये तर पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी साथ सोडूनही फक्त शरद पवारांच्या करीष्म्यावरती पक्षाने ५४ आमदार निवडून आणले आणि महा विकास आघाडीचा प्रयोग करून सत्ताही स्थापन केली होती.
लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही पवारांची तुतारी दणक्यात वाजणार का?
लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. विधानसभेला अवघे ३ महिने शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. लोकसभे प्रमाणे विधानसभा निवडणुकीत सुद्धा राज्यात महा विकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना पाहायला मिळणार असला तरी चर्चेच्या केंद्रस्थानी राहतील ते म्हणजे शरद पवार राष्ट्रवादीतील फुटीनंतर हि पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने शरद पवार नेमका काय डाव टाकणार? आपल्या पक्षाला पुन्हा एकदा नवी उभारी कशी देणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य आहे. कोणत्याही क्षणी डाव पलटविण्याची ताकद आणि क्षमता शरद पवारांकडे असल्याने आजही भलेभले त्यांना दचकून असतात… आताही शरद पवार यांच्याकडे म्हणावे तसे आकडे नाहीत.. अजित पवारांच्या बंडा नंतर जमतेम १२-१३ आमदार शरद पवारां सोबत आहेत. त्यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह सुद्धा निवडणूक आयोगाने काढून घेतलं आहे. मात्र तरीही लोकसभे प्रमाणेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा पवारांची तुतारी दणक्यात वाजू शकेल असं बोललं जातंय. पवार पुन्हा आपली पॉवर दाखवू शकतील का? त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेत पुन्हा एकदा मुसंडी मारू शकतो का ? हे जाणून घेऊयात,
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून हा पक्ष जास्तीत जास्त काळ सत्तेत राहिलाय. शाहू- फुले- आंबेडकरांचा विचार जपणारा आणि शेतकरी कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार हा पक्ष… आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात महत्वाची खाती सांभाळली आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेशी चांगलीच नाळ सुद्धा जोडली हा इतिहास आहे. १९९९ मध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला ५८ जागांवर यश मिळालं. त्यानंतर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक ७१ जागा जिंकता आल्या. २००९ सालच्या विधानसभेला पुन्हा ६२ आमदार राष्ट्रवादीने निवडून आणले. या तिन्ही निवडणुकांनंतर पक्षाने राज्यातील सत्ता आपल्या हातात ठेवली. मात्र २०१४ मध्ये भाजप- शिवसेनेचे सरकार आलं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ आमदाराना निवडून आणता आलं. २०१९ ला तर पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी साथ सोडूनही फक्त शरद पवारांच्या करिष्म्यावती पक्षाने ५४ आमदार निवडून आणले आणि महा विकास आघाडीचा प्रयोग करून सत्ताही स्थापन केली
परंतु अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि शरद पवारांकडे अवघे १२ आमदार राहिले. शरद पवार आणि त्यांचा पक्ष संपला असे मत अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त सुद्धा व्यक्त केलं. मात्र हार मानतील ते पवार कसले. पक्ष आणि चिन्ह गेलं, निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह शरद पवारांना दिले. तीच तुतारी पवारांनी लोकसभा निवडणुकीत फुंकली आणि त्यांच्या पक्षाने १० पैकी ८ खासदार निवडून आणत विरोधकांना धोबीपछाड दिला आहे.
आता आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा पक्षाला मोठी अपेक्षा आहे आणि सत्तेत बसण्याची संधीही शरद पवारांकडे स्वतःची पॉवर आहे, एकनिष्ठ नेत्यांची फळी आहे, युवा नेत्यांची साथ आहे आणि महत्वाची बाब म्हणजे बेरजेचे राजकारण करण्याची खेळी आहे. त्यामुळेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुन्हा एकदा उभारी घेण्याची संधी मिळालेली आहे.
