सुनील भंडारे पाटील
वढू बु।। (तालुका शिरूर) येथील श्री धर्मवीर शंभूराजे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयामध्ये महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग व पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग यांच्या संयुक्त विद्यामान ‘शिक्षण सप्ताह’ निमित्त दिनांक 26 जुलै 2024 रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी विद्यालयामध्ये आठवडे बाजार व खाऊ गल्ली हा उपक्रम राबविण्यात आला.
खाऊ गल्लीमध्ये जवळजवळ 20 स्टॉल व प्रत्येक प्रकारचा शेतीमाल विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणला.यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय दिसून आला.या उपक्रमांतर्गत खरेदी विक्रीचे व्यवहार,नफा तोटा यांचे ज्ञान मिळाले.आठवडे बाजारामध्ये विविध शेतीमाल व खाऊ गल्लीमध्ये विविध फळे व आरोग्यदायी खाद्यपदार्थाची विक्री करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री धर्मवीर शंभूराजे शिक्षण प्रसारक मंडळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर साहेब ,विद्यालयाचे मुख्याध्यापक.एकनाथ चव्हाण सर,जेष्ठ शिक्षक.विलास कुरकुटे .सोमनाथ भंडारे.मिठठू सोनवणे.शिवले रामचंद्र, पोपट वणवे सर, रवींद्र भामरे सर.राजेश आग्रे सर.हरिष शिंदे सर,.मंगल मोकाशी मॅडम.सुनंदा काकडे मॅडम.मनीषा साळुंखे मॅडम.शहाजी येडे सर.काळू सुर्यवंशी सर.शरद भंडारे सर.प्रणाली कोबल मॅडम.किरण गोरे मॅडम.चैत्राली अरगडे मॅडम व सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनीनी परिश्रम घेतले.
