March 30, 2026
संभाजी ब्रिगेडच्या उत्तर पुणे जिल्हाध्यक्षपदी चंद्रशेखर घाडगे यांची फेरनिवड 

संभाजी ब्रिगेडच्या उत्तर पुणे जिल्हाध्यक्षपदी चंद्रशेखर घाडगे यांची फेरनिवड 

सुनील भंडारे पाटील

पुणे येथे संभाजी ब्रिगेड बांधणी व विस्तार कार्यक्रम अंतर्गत संभाजी ब्रिगेड चा जाहिर पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता,

या पदग्रहण सोहळ्यात महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष, विभागीय कार्यकारिणी, राज्यकार्यकारिणी यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या,

संभाजी ब्रिगेड पुणे उत्तर जिल्हाध्यक्षपदी चंद्रशेखर घाडगे यांची फेर निवड करण्यात आली, संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष ॲड मनोजदादा आखरे व महासचिव सौरभदादा खेडेकर यांनी चंद्रशेखर घाडगे यांना जिल्हाध्यपदाच्या निवडीचे पत्र दिले,

यावेळी व्यासपीठावर, संभाजी ब्रिगेड चे मुख्य प्रवक्ते प्रा. गंगाधर बनबरे, प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, अण्णासाहेब सावंत, प्रवक्ते संतोष शिंदे, प्रेमकुमार बोके, सुदर्शन तारख, प्रदेश संघटक इंजी मनोजकुमार गायकवाड, सचिव संदीप कडलग, उपस्थित होते,

संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वाने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवत संभाजी ब्रिगेड पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष पदी संधी दिल्याबद्दल नेतृत्वाचे घाडगे यांनी मनपुर्वक आभार मानले,

शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, यांच्या विचारांवर काम करून, संभाजी ब्रिगेड चे विचार शेतकरी, कामगार, कष्टकरी, यांचा आवाज आणि लोकशाहीची मूल्य यांच्या आवाजासाठी कायम कटिबद्ध राहील, माझे जिवाभावाचे असलेले सर्व सहकारी म्हणजे माझे जिल्हापदाधिकारी यांचे सहकार्य आणि साथ हे माझ्यासाठी खुप मोलाचे आहे, त्या सर्व पुणे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मी कायम ऋणी राहील ,

तसेच लवकरच जिल्ह्याचा दौरा करून प्रत्येक तालुक्यात पदाधिकाऱ्यांची विभागनिहाय बैठक घेऊन पुनर्बांधणी करण्यात येणार आहे, येणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायतसमिती, निवडणुकीत संभाजी ब्रिगेड आपली ताकद दाखवणार आहे, शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या महापालिका भागातही संभाजी ब्रिगेड आपली ताकद दाखवणार आहे,

जिल्हाध्यापदी काम करत असताना अनेक आंदोलने, सामाजिक कार्यक्रम, संघटन वाढीसाठी करत आलेलो काम, या चांगल्या कामाची पावती नेतृत्वाने दिली,असे मत संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी व्यक्त केले,

महानगरध्यक्ष अविनाश मोहिते, यांच्यासहित इतर पक्ष व सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी व असंख्य हितचिंतकांनी कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या,