March 30, 2026
घृष्णेश्वर,औंढा नागनाथ,परळी वैजनाथ सह मोहटा देवी दर्शनाचा तुळापूरातील पाचशे भाविकांनी घेतला लाभ मारुती शिवले मित्र परिवाराचा मोफत धार्मिक उपक्रम

घृष्णेश्वर,औंढा नागनाथ,परळी वैजनाथ सह मोहटा देवी दर्शनाचा तुळापूरातील पाचशे भाविकांनी घेतला लाभ….

मारुती शिवले मित्र परिवाराचा मोफत धार्मिक उपक्रम

सुनील भंडारे पाटील

श्रावण मासाच्या पवित्र आणि भक्तिमय मासाचे अवचित्य साधत हवेली तालुक्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र समाधीस्थळ असलेल्या श्री क्षेत्र तुळापुर येथील उद्योजक तथा युवा नेते मारुती पांडुरंग शिवले आणि मित्र परिवाराकडून श्री क्षेत्र तुळापुर ते परळी वैजनाथ,औंढा नागनाथ हिंगोली,घृष्णेश्वर छ.संभाजीनगर येथे महिलांसाठी मोफत ज्योतिर्लिंग देवदर्शन यात्रेचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले होते,

त्यात ५०० पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेऊन या देवदर्शन यात्रेला उत्स्फूर्त प्रचंड प्रतिसाद दिला.या ज्योतिर्लिंग यात्रेबरोबर घरी परतीच्या प्रवासात येताना महिलांसाठी खास नगर जिल्ह्यातील मोहटा देवीचे दर्शनही मारुती शिवले मित्र परिवाराने यात्रेत घडविले.

मारुती शिवले मित्र परिवाराकडून या संपूर्ण ज्योतिर्लिंग यात्रेचे अगदी चोख नियोजनबद्ध आयोजन करून यात्रेत सहभागी असलेल्या ग्रामस्थ भाविकांना सर्व सोई,सुविधा देत यामध्ये सकाळचा नाष्टा,दररोज दुपार,रात्री दोन टाईमचे स्वादिष्ट भोजन,प्रत्येक गाडीत आरोग्यासाठी मेडीसिन व्यवस्था,राहण्याची उत्तम निवासाची व्यवस्था,अशा सर्व सोई,सुविधा दिल्याने

ही यात्रा अगदी चोख यशस्वीरित्या संपन्न होत पार पडली असल्याने यात्रेच्या आयोजन व नियोजना बद्दल तुळापुर परिसरात यात्रेची जोरदार चर्चा रंगत असून तुळापुर करांकडून यात्रेचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.याबद्दल सहभागी भाविकांनी मारुती शिवले व मित्र परिवाराचे आभार मानत यापुढे सोबत कायम राहण्याचे आश्वासन दिले आहे.

हिंदू धर्मामध्ये श्रावण मासाचे आपले वेगळे महत्व असून या महिन्यांमध्ये केलेले धार्मिक कार्य अत्यंत पवित्र मानले जाते.श्रावण मासातील भक्तिभाव,जल अर्पणाची परंपरा आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भाविकांना ज्योतिर्लिंग महादेवाचे दर्शन घडवून देण्यासाठी तुळापूरकर भाविकांसाठी संपूर्ण प्रवासात मोफत व्यवस्था करण्यात आली होती.

तुळापुर गावातील ज्येष्ठ प्रमुख मान्यवर,ज्येष्ठ महिला भगिनी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते मारुती शिवले आणि मित्र परिवाराच्या नियोजनबद्ध आयोजनाखाली अत्यंत चांगल्या वातावरणात यात्रा संपन्न झाली.मारुती शिवले आणि मित्र परिवाराचा धार्मिक सामाजिक बांधिलकीचा व सेवाभावी दृष्टिकोनाचा एक उत्तम प्रत्यय तुळापूरकर ग्रामस्थांना आला असून या यात्रेमुळे तुळापुरातील खास करून अनेक शिवभक्त महिलांना ज्योतिर्लिंग दर्शनाचा व अनोख्या अध्यात्मिक अनुभवाचा लाभ व आत्मिक समाधान यामुळे मिळाले आहे.

या ज्योतिर्लिंग यात्रेच्या निमित्ताने तुळापुर परिसरातील सर्व महिला वर्गामध्ये उत्साहाचे आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असून मारुती शिवले आणि मित्र परिवाराकडून यशस्वीपणे झालेल्या या देवदर्शन यात्रेचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

आम्ही साधारण शेती करणारी माणसं असून आमचे कुटुंब धार्मिक वारकरी संप्रदायातील असून हेच संस्कार माझ्या फुलचंद व मारुती दोन्ही मुलांनी पुढे चालविले असून माझ्या मारुती शिवले या मुलाने गावासाठी श्रावण महिन्याचे औचित्य साधून ही ज्योतिर्लिंग यात्रा काढली.यापुढे असेच समाजकार्य तुळापुर गावांसाठी माझी मुले करणार आहेत.त्यांच्या पाठीशी माझे व माझ्या कुटुंबाचे सदैव आशीर्वाद आहे.

 लक्ष्मी पांडुरंग शिवले,मारुती शिवले यांच्या आई/मातोश्री

मला व माझ्या कुटुंबाला पांडुरंगाची आवड जास्त असल्याने आम्ही पंढरीची वारी करणारी आधी शेतकरी कुटुंबातील माणसे आहोत.पंढरीच्या कृपेनेच आमच्या घराचा कायापालट झाला असून हेच आमचे संस्कार आमच्या मुलांनी पुढे चालवत ठेऊन या श्रावण महिन्यात या ज्योतिर्लिंग यात्रेचे तुळापुर येथील भाविकांसाठी आयोजन केले.असेच उत्तम कार्य आपल्या तुळापुर गावासाठी माझी मुले यापुढेही सुरू ठेवतील.

पांडुरंग शिवले,मारुती शिवले यांचे वडील/पिताश्री