March 30, 2026
पुणे नगर तीन मजली उड्डाण पुलाचे काम तातडीने सुरू व्हावे गडकरींना निवेदन

पुणे नगर तीन मजली उड्डाण पुलाचे काम तातडीने सुरू व्हावे गडकरींना निवेदन

सुनील भंडारे पाटील

                पुणे ते अहिल्यानगर संभाजीनगरच्या तीन मजली उड्डाणपूलाचे काम लवकर सुरू व्हावे नितीन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे योगीराज शिंदे यांची मागणी,

पुणे नगर रस्त्यावर खराडी आय टि पार्क , पुणे विमानतळ ,धर्मपंढरी वढू_तुळापूर ,आळंदी , अष्टविनायक थेऊर गणपती , रांजणगाव गणपती , रांजणगाव औद्योगिक वसाहत मध्ये मोठया प्रमाणावर आंतरराष्ट्रीय कंपन्या आहे ,

लाखो कामगार या भागात काम करतात तसेच मराठवाड्यतील अनेक रुग्ण रुबी हॉल जहागीर हॉस्पिटल मध्ये उपचार साठी येत असतात या ट्राफिक मुळे सर्व सामान्य जनतेचे आर्थिक , सामाजिक , मोठे नुकसान होत आहे,

अनेक वर्षे फक्त घोषणा होत आहे कामाला सुरुवात होत नाही जनता याला कंटाळलेली आहे तरी आपण विकासपुरुष आहात हे काम आपण लवकर चालू कराल अशी अपेक्षा योगीराज बाळासाहेब शिंदे उपाध्यक्ष भाजप सांस्कृतिक आघाडी पुणे यांनी मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन भावना व्यक्त केली,

शिंदे हे मुरलीधर मोहोळ ,चंद्रकांत पाटील ,बाळा भेगडे ,राहुल कुल ,प्रदीपदादा कंद , गणेश भेगडे ,जयश्री पलांडे ,प्रिया बेर्डे ,दादासाहेब सातव ,संदीप भोंडवें , रविंद्र कंद ,जतीन पांडे अमित सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली काम करत असून संबंधित महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या भावना त्यांनी मंत्री गडकरी यांच्यासमोर लेखी निवेदनाद्वारे मांडले आहेत, 

तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले पुणे _नगर, संभाजीनगर महामार्गावरील तीन मजली उड्डाणपुलाचे काम तातडीने चालू व्हावे अशी विनंती त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे,

यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितले की, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या एक ते दोन महिन्यांमध्ये संबंधित उड्डाण पुलाचे काम चालू करणार आहोत असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले