“36 वर्षां” नंतर माजी विद्यार्थ्यांचा “स्नेहमेळावा”
बारामती प्रतिनिधी गोरख थोरात
रविवार दिनांक 27/07/2025 सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सोमेश्वर विद्यालय, अंजनगांव, ता. बारामती, जि. पुणे येथे सन 1988-89 च्या 10 वी च्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला,
सदर मेळाव्यास त्याबॅचचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच विद्यालयाच्या स्थापनेपासून मुख्याध्यापक पदी नियुक्त राहीलेले यशवंत घाडगे, सहशिक्षक देवकाते सर व साळुंखे सर हे कार्यक्रमाला उपस्थित होते. मेळाव्याचे सुत्र संचालन माजी विद्यार्थी अॅङ राजीव मोरे यांनी केले. प्रास्तविक सुर्यकांत मोरे यांनी केले. या स्नेहमेळाव्याच्या वेळी मोहन चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, रत्न मोरे, मंदा धाडगे, शोभा गावडे, मनिषा कुचेकर, अलका चव्हाण, राजश्री सव्वालाख, संजय सस्ते, राजू लावंड, रविंद्र घोरपडे, प्रभाकर परकाळे, प्रल्हाद वायसे, अनिल दळवी, इ. यांनी स्वतः व कुटंबाबाबत मनोगत व्यक्त करून विद्यालयीन कालावधीतील अनुभव कथन करून विद्यालय, शिक्षक व शिक्षकेतर वर्गातील कर्मचारी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
तब्बल 36 वर्षानंतर सर्व विद्यार्थी एकत्र आल्याने एकमेकांना भेटल्यानंतर आनंद ओसंडून वाहत होता, 36 वर्षांपूर्वीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या, घंटा नादाने शाळा भरली दिवसभरामध्ये एकमेकांच्या आठवणी विषयीची चर्चा तसेच स्नेहभोजन यामध्ये संपूर्ण दिवस गेला, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला,
अध्यक्षीय भाषणात घाडगे सरांनी कार्यक्रमाचे व उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आभार प्रदर्शन लक्ष्मीकांत थोरात यांनी केले.
