March 30, 2026
शिक्रापूर मध्ये पोलिसांच्या या गाडीला वाली कोण?

शिक्रापूर मध्ये पोलिसांच्या या गाडीला वाली कोण?

 

सुनील भंडारे पाटील 

डोळे असून आंधळेपणाचे सॉंग अशी अवस्था, गेल्या एक महिन्यापासून अपघात झालेली पोलिसांची व्हॅन गाडी शिक्रापूर (तालुका शिरूर) येथे पुणे नगर मार्गाच्या कडेला उभी आहे,

पोलीस खाते तसेच या मार्गावरून प्रवास करणारे हजारो डोळे ही गाडी पाहत असून पोलिसांची या गाडीला वाली कोण? अशी परिस्थिती तयार झाली आहे,

याबाबतची माहिती अशी की, एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला नागपूरला पोहोचवण्यासाठी एक महिन्यापूर्वी पुणे शहर पोलीस खात्याची पोलीस व्हॅन गाडी चालली असताना

शिक्रापूर येथील पुणे नगर महामार्ग लगत असणाऱ्या जीत धाब्याच्या समोर या गाडीचा टायर फुटून अपघात झाला

पलटी झाल्यामुळे ही गाडी चेमली, चालक जखमी झाला असून आरोपीला काही झाले नाही असे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे तपासीय हवालदार बापू हाडागळे यांनी सांगितले परंतु आरोपीला दुखापत झाल्याचे व जखमी झाल्याचे नागरिकांनी सांगितले,

या घटनेचा तपास हवालदार बाप्पू हाडगळे यांच्याकडे होता,  आरोपीला सोडण्यासाठी चाललेल्या पोलीस व्हॅनचा अपघात होऊन एक महिना लोटला तरी अपघात ग्रस्त गाडी अजून त्याच ठिकाणी उभी आहे,

या अपघाताची कुठेही नोंद नाही, यावरून सरकारी मालमत्तेचा गैरवापर, या गोष्टी स्पष्ट होत असून ही गाडी आता जागेवरच कुजणार का? या पोलिस व्हॅनला वाली कोण?असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे ,