March 30, 2026
राधेश्वरी नगरी वाघोली येथे टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी उत्साहात

सुनील भंडारे पाटील

अध्यात्मिक शक्ती आपल्या मुलांनाही वारीच्या माध्यमातुन अनुभवता यावी या उद्देशाने राधेश्वरीनगर वाघोली (तालुका हवेली) मधील रहिवाशांनी दिंडीचे आयोजन केले होते.

यात लहान मुलांनी आपल्या संतांची वेशभूषा केली होती. टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात हा सोहळा सर्वांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी आसपासच्या सर्व सोसाट्यांनी दिंडीचे स्वागत करुन मनोभावे पूजन केले. तसेच दिंडी मध्ये विसावा कशा पद्धतीनी असतो त्याची व्यवस्थ कशी असते, पुढे चालणाऱ्या दिंडया व पाठीमागे चालणाऱ्या दिंडया याच नियोजन कस असत असे अनेक विशय मुलांना या मधुन शिकवण्यात आले तसेच दिंडी मध्ये सर्व राधेश्वरी नगरीतील भाविकांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल आयोजकांनी आभार मानले

दिंडी सोहळ्याला राधेश्वरीनगरीचे चेअरमन देवेंद्र खवले यांनी भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. शेवटी आरती झाल्यानंतर पसायदान घेऊन सर्वांना एकादशी निर्मित्त फराळाचे वाटप करण्यात आले.

यावेळी मोठ्या संख्येने मुलांनी तसेच राधेश्वरी नगरी मधल्या रहिवाशांनी सहभाग घेतला होता,