March 30, 2026
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला 
             वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  विद्यार्थ्यांनी वारकरी होऊन दिंडीचे आयोजन केले होते.          

वाबळेवाडी (ता. शिरूर) येथील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती, आणि ग्रामस्थांनी या दिंडीचे उत्साहाने स्वागत केले. इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गाची ही दिंडी संपूर्ण गावातून काढण्यात आली. यावेळी  ग्रामस्थांनी या दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. दिंडीचे स्वागत  ग्रामस्थांनी पुष्पवृष्टीने केले तर काहींनी विद्यार्थ्यांच्या पालखीला हळद-कुंकू लावून नटलेल्या विठ्ठल रुक्माईचे औक्षण केले व  दिंडीचे दर्शन घेतले.

शालेय विद्यार्थ्यांची दिंडी वाजत गाजत टाळ मृदंगाच्या तालात शालेय प्रांगणात दाखल झाली. यावेळी रिंगण तयार करून विद्यार्थी या रिंगणाभोवती  विना आणि भगवी पताका घेऊन धावले. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात एकच ठेका धरला आणि हरी नामाचा गजर आसमंतात दुमदुमला. यावेळी कुणी फुगड्या खेळले तर कोणी आनंदाने टाळ्या वाजवल्या, कुणी उड्या मारल्या तर कोणी भजन म्हटले. संपूर्ण शालेय वातावरण पांडुरंगमय झाले होते. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. या    
  कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुरेखा वाबळे, उपाध्यक्ष सतिश कोठावळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, माजी उपसरपंच भगवान वाबळे, केशवअण्णा वाबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंकुश वाबळे, माजी सरपंच दिलीप वाबळे, सतिश वाबळे, प्रकाश वाबळे, दत्तात्रय बारगळ, शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पवार, उपमुख्याध्यापिका शरीफा तांबोळी, एकनाथ खैरे, सुनील पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरख काळे, प्रतिभा पुंडे, तुषार सिनलकर, दीपक खैरे, पोपट दरंदले, संदीप गीते, विद्या संकपाळ, सचिन बेंडभर आदी उपस्थित होते,