March 30, 2026
लोणीकाळभोर अनिकेत मुळीक 
दलित चळवळीत सुवर्णपान ठरलेल्या दलित पॅंथरचा ५० वा वर्धापन दिन अर्थात सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधुन  सावित्रीबाई फुले सभागृहात दलित पॅंथर : मुक्त संवाद व पॅंथर गौरव  सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश संस्थापक नेते राहुलची डंबाळे प्रदेशाध्यक्ष सुवर्णाताई  डंबाळे यांनी केले होते.        

 या गौरव सोहळ्यात बहुजन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद वैराट यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पॅंथर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सन्मान चिन्ह , मानपत्र , शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

 सदर प्रसंगी डॉ. लक्ष्मीकांत देशमुख ( मा. अध्यक्ष अ. भा. मराठी साहीत्य संमेलन ) मा. तानसेनभाई ननावरे ( जेष्ठ पॅंथर नेते , मा. रोहीदास गायकवाड ( जेष्ठ पॅंथर नेते ), मा. रमेशदादा बागवे ( मा. गृह राज्यमंत्री ) मा. अविचल धिवार ( उद्योजक व विचारवंत ),   यांच्या हस्ते  चळवळीतील योगदाना बद्दल  पॅंथर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मा. राहुल डंबाळे व सुवर्णा डंबाळे यांचेसह मा. उमेश चव्हाण ( रुग्ण हक्क परिषद ) विठ्ठलदादा गायकवाड ( फुशाआं विचार मंच ) मिलिंद आहिरे, प्रा. अशोक गायकवाड( व इतर मान्यवर उपस्थित होते.     

  कार्यक्रमातील मान्यवरांनी आपल्या भाषणातुन चळवळी बद्दल अत्यंत महत्वपुर्ण विचार मांडले. व यावेळी पुणे , पिंपरी चिंचवड , पुणे जिल्हा , मुंबई , नाशिक , अहमद नगर , औरंगाबाद येथिल पॅंथर चळवळीतील व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात आले.