शिरूर तालुक्यामध्ये महसूल विभागाने गेल्या दोन चार वर्षांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने शिरूर तालुक्याच्या नावाचा चांगलाच गवगवा केला आहे.
भ्रष्टाचाराची व घोटाळ्यांची इतिहासात नोंद होईल असा भ्रष्टाचार व घोटाळा शिरूर तालुक्यामध्ये घडत आहेत. यात काही प्रकार उघडकीस आले आहे त्यामध्ये सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या बरोबरच झिरो तलाठी म्हणून काम करणार्या काही महाभागांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी शिरूर महसूल विभागाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.
शिरूर तालुक्यामध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला पुनर्वसन जमिनीचा वाटप घोटाळा , शिरूर तालुक्यातील अनेक वादग्रस्त जमिनीचे व्यवहार , या मध्ये यासंबंधीत काही झिरो तलाठ्यांनी आपल्या मर्जीतील नेत्यांसाठी कामे करून सरकारी यंत्रणेचा वापर करुन शासनाचा कितीतरी महसूल बुडवला आहे .
मात्र सध्या तलाठी व मंडल अधिकारी यांना आपली कामे परस्पर होत असल्याने व त्या बदल्यात आर्थिक मलिदा ही मिळत असल्याने तलाठी व मंडळ अधिकारी ही अशा झिरो तलाठ्यांना , एजंटांना आपल्या दिमतीला ठेऊन घेत आहेत मात्र हे संबंधित झिरो तलाठी हे कामगार तलाठी व मंडळाधिकारी यांच्या नावाने शेतकऱ्यांना व सर्वसामान्य जनतेला अक्षरशः लुटून खात आहे .
याबाबत शिरूर च्या तहसीलदार रंजना उंबरहांडे यांच्याशी संपर्क साधला होता माञ त्यांनी ही संबंधित विषयाकडे कांहीसे दुर्लक्ष केल्याने तहसीलदारांच्याच संमतीने झिरो तलाठी काम करत नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे ? कारण मागील दोन वर्षापूर्वी शिरुर तहसील कार्यालयातील कागदपञांच्या स्कॅनिंग साठी एका महिला तलाठ्यांनी झिरो तलाठ्यांचा वापर केला असता वाघाळे तालुका शिरूर येथील फेरफाराची दोन पुस्तके गायब झाली होती. मात्र स ध्या शिरूर तालुक्यामध्ये बहुतांशी ठिकाणी सरकारी यंत्रणेच्या साहाय्याने झिरो तालुक्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल्याने शिरूर तालुक्यातील काही जमिनींचे महत्त्वाचे कागदपत्र गहाळ झाले तर नवल वाटणार नाही.
या बाबत भाजपाचे जिल्हा ऊद्योग आघाडीचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी सांगितले की , जे कोणी कामगार तलाठी व मंडलाधिकारी झिरो तलाठी वापरतील त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे संजय पाचंगे यांनी सांगितले.