March 30, 2026
शिरूर तालुका विशेष प्रतिनिधी 
         टाकळी हाजी तालुका शिरूर येथील मा.बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे आदर्श प्राचार्य आर.बी.गावडे सर यांची शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.   

 आर.बी गावडे सर यांनी गावडे विद्यालयामध्ये अनेक सामाजिक उपक्रम केले आहे.विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे.    

प्राचार्य पदाचा स्वीकार केल्यापासून विद्यालयाला अनेक “आदर्श विद्यालय पुरस्कार” मिळून दिले,तसेच शिष्यवृत्ती निकाल,दहावी-बारावीचा निकाल १००% लावण्याचा प्रयत्न केला आहे.अनेक सांस्कृतिक कार्यक्रम,स्पर्धा असे अनेक उपक्रम याठिकाणी राबविले आहेत.

एवढेच नव्हे तर बाहेरील जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी या विद्यालय भेट देऊन गुणगान गायले आहे,त्यांच्या या सर्व कार्यामुळे त्यांची निवड केली आहे.
       त्यांच्या या निवडीबद्दल ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार पोपटरावजी गावडे, जिल्हा परिषदेच्या मा.सदस्या श्रीम.सुनिता गावडे,ग्रामविकास शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र गावडे यांनी अभिनंदन केले.