March 30, 2026
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
        ग्रामीण भागातील विद्या र्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कान्हूर मेसाई येथे स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रमानंतर कान्हूर मेसाई येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे स्व . फक्कडमामा व भाऊसो शिंदे यांचे स्मरणार्थ आयोजन करणेत आले होते .       

कान्हूर मेसाई ते सविंदणे रोडला भोकनळ वस्तीपर्यंत ५ कि . मि . अंतरासाठी घेतलेल्या या स्पर्धेसाठी ९वी ते १२ वीच्या ७७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता . गोल्ड मेडल विजेत्या बिडचे गरीब कुटुंबातील अविनाश साबळेची प्रेरणा घेऊन या ग्रामीण विभागात या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजना साठी शिक्षकवृंद , ग्रामस्थ , प्रा . मच्छिंद्र राऊत,पर्यवेक्षक आंधळे सर यांनी प्राचार्य अनिल शिंदे व सरपंच चंद्रभागा खर्डे यांचे मार्गदर्शना खाली सर्व ग्रामस्थांचे सहकार्यांने या स्पर्धेचे आयोजन होते . या स्पर्धेत प्रथम क्र . संकेत जाधव, द्वितीय रोहन भोकनळ, तृतीय हनुमान मिडगुले , चतूर्थ प्रथमेश वाघोले, पाचवा क्र . विशाल जाधव यास मिळाला . हायस्कूलचे  छात्रांनी स्पर्धा नियोजनास सहाय्य केले . ग्रामस्थांचे हस्ते यशस्वी स्पर्धकांस रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देणेत आले . बिभिषन मिडगुले , सदाशिव पुंडे व मान्यवरांनी विजेत्याना वैयतीक बक्षीसेही दिली . आभार प्रदर्शन प्रा . अनिल शिंदे यांनी केले .