March 30, 2026
गुनाट प्रतिनिधी : एकनाथ थोरात
             उरळगाव( ता. शिरूर) स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्त केंद्र सरकार व राज्य शासनाच्या निर्देशानुसार देशात घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा) या उपक्रमासह विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे.(Blood Donetion)  हे त्यानिमित्ताने शिरूर – हवेली विधानक्षेत्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन तसेच स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जगदंबा प्रतिष्ठान मार्फत खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिरूर -हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या सहकार्याने उरळगाव येथील चंद्रभागा मंगल कार्यालय येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिराचे उद्घाटन ज्यांनी प्रथम रक्तदान केले असे संतोष सात्रस यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरामध्ये प्रत्येक रक्तदात्यास ६ लाखाचे सुरक्षा कवच विमा देण्यात आला आहे उरळगाव परिसरातून अनेक नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला शिरूर- हवेली विधानसभा क्षेत्रात ७ ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते उळगाव, तळेगाव ढमढेरे , चौफुला, शिरूर शहर नगरपरिषद, मांडवगण फराटा, कोरेगाव मूळ/ उरुळी कांचन, वाघोली अशा अनेक ठिकाणी शिबिराचे आयोजन चांगल्या प्रकारे करण्यात आले व नागरिकांनी त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उरळगाव येथील चंद्रभागा मंगल कार्यालय या शिबिरामध्ये जिल्हा परिषद सदस्या सुजाता भाभी पवार, सरपंच अशोक चव्हाण, अशोक कोळपे , राजेंद्र गिरमकर ,तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम महाराज गिरमकर, शेखलाल चाचा ,नामदेव पाचुंदकर ,अर्जुन पाचुंदकर,संतोष रणदिवे, शरद बापू निंबाळकर , सागरराजे निंबाळकर , संतोष दौंडकर, राहुल करपे ,संदीप यादव, वाल्मिक  सातकर , आप्पा वडघुले, उत्तम लोखंडे, निमोणे सरपंच संजय काळे, निमोणे उपसरपंच डॉ. संतोष जाधव, दिलीप काळे, राष्ट्रीय मानव अधिकार शिरूर शहर अध्यक्ष शकीलभाई मणियार , तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. उरळगाव येथील कार्यालय उपलब्ध करून देण्यासाठी मा. सरपंच प्रशांत सात्रस यांनी मोलाचे सहकार्य केले आणि डॉ. विशाल पांडुळे व जनसेवा मिरज टीम यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.