March 30, 2026
शिनोली प्रतिनिधी मिलिंद टेमकर
        १५ ऑगस्ट स्वातंत्र्य  दिन आजादी का अमृत महोत्सव निमित्त  ७५  साल आजादि के या मंगल प्रसंगी सर्व भारतीयांना 
 शुभेच्छा देण्यासाठी तसेच भारतीय जवान आणि शहीद बांधवांना आदरांजली वाहण्यासाठी सह्याद्रीची वारसदार वाघीण मुद्रा अर्चना प्रशांत करंडे  वय वर्ष ४ . रा .काठापूर बु.(ता.आंबेगाव) येथील  चिमुकलीने  स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संधेला किल्ले पुरंदर तसेच किल्ले मल्हार गड पायी सर केले.  

मुद्राने इंडियन आर्मी चा गणवेश परिधान करून किल्ले पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मस्थळी  भारताचा तिरंगा डौलाने फडकवत मुद्रा हिने  तिरंग्याला सलाम करून मानवंदना दिली.तसेच राष्ट्रगीत गावून व देश भक्तीपर काव्य पंक्ती  भाषण सादर करून जमलेल्या भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

        तसेच दुपारच्या सत्रात किल्ले मल्हार गड सर करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गर्जनेचा गारदेचा जयघोष करून स्वातंत्र्य दिना निमित्त घोषणा देवून  भारतीय तिरंग्याला मान वंदना दिली. मुद्राच्या सोबत नेहमीच तिचे आई बाबा तिला मार्गदर्शन करत असतात.या मोहिमेमध्ये  मचींद्र शिर्के,निलेश आरोटे यांचे विशेष सहकार्य  लाभले.आता पर्यंत मुद्राने वयाच्या अडीच वर्षापासून गडकिल्ले स्वतः पायी  सर करण्याचे बाळकडू आपल्या आई वडिलांकडून घेतले. मुद्रा ने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील सर्वोत्तम उंच शिखर कळसुबाई पार करून कळसूबाई मातेच्या मंदिरासमोर भारदस्त आवाजात शिवगर्जना देत तसेच देशा प्रती भाषण देत कोविड योद्धे व भारतीय जवान यांना मानवंदना दिली आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्यात्या अर्चनाताई भोर – करंडे यांची ही कन्या . आईच्या गर्भात असतानाच शिव संस्कार अंगिकारत होती. गरोदर महिन्यातील ७ व्या महिन्यात जन्माला आलेली ही मुद्रा अतिशय हुशार कुशाग्र बुद्धिमत्ता असलेली एक आगळी वेगळी शिवकन्या आहे.  
        खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या समोर मुद्रा ने  दिलेली शिवगर्जना गारद सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध होत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी मुद्रा चे शौर्य पाहून तिला शिवकालीन चलन देवून सन्मानित केले आहे.
सातारा येथे तिला बाल शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती तुळापूर येथे शिरूर चे आमदार ॲड.अशोक पवार यांनी मुद्रा ला शंभू गौरव पुरस्कार प्रदान केला. लोकनेते आमदार निलेश लंके यांनी देखील तिच्या शौर्य बद्दल तिला सन्मानित केले आहे. १२ जानेवारी ,जिजाऊ जयंती निमित्त मुद्रा ने  शिवजन्मभूमितील किल्ले निमगिरी सर करून मासाहेब जिजाऊ यांना पारंपरिक वेशभूषा परिधान करून  अभिवादन केले.
     या पूर्वी किल्ले हडसर ,जीवधन येथे सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रवेशद्वार सोहळा दरम्यान देखील राष्ट्रभक्ती तसेच  शिवगर्जना आणि शिव विचार मुद्रा ने  मांडले. मुद्रा सह्याद्री प्रतिष्ठानच्या  सोहळ्यात सहभागी होऊन नेहमीच शिव मावळ्यां समोर राष्ट्रभक्ती तसेच शिवगर्जना देवून चेतना प्रेरणा निर्माण करत असते.आतापर्यंत मुद्रा ने चार वर्षात किल्ले रायगड,शिवनेरी,जंजिरा,हडसर,जीवधन,निमगिरी,पद्मदुर्ग,नारायणगड ,सिंहगड,रायरेश्वर, मल्हारगड,पुरंदर ,रेवदंडा असे किल्ले मुद्रा ने पायी सर केले आहेत. तिला नेहमीच आईचे मार्गदर्शन संस्कार मिळत आहेत.भविष्यात मुद्रा एक प्रसिद्ध वक्ता होईलच त्याच बरोबर एक गिर्यारोहक सुद्धा होईल यात तिळमात्र सुद्धा शंका नाही.