सुनील भंडारे पाटील
पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळाची ( PMPML) बस सेवा काही कारणास्तव बंद झाली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे विशेषतः विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत होते. ही बस सेवा पुन्हा सुरू व्हावी म्हणून केंदूर, करंदी, वाजेवाडी, वढू गावातील सर्व ग्रामस्थांनी मागणी केली होती. ग्रामस्थांची मागणी आणि भावना पुण्याचे खासदार गिरीशजी बापट यांना पत्र लिहून लक्षात आणून दिली. बापट साहेबांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून सदर बस सेवा लवकरात लवकर सुरू करावी यासाठी PMPLM प्रशासनाला पत्र लिहून मागणी केली तसेच ही बस सेवा लवकरात लवकर पुन्हा सुरू होऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही असे आश्वासन दिले.
वास्तविकता पुणे शहर हे आसपासच्या संपूर्ण ग्रामीण भागाला पी एम पी एल च्या माध्यमातून जोडलेली आहे, प्रवाशांसाठी पी एम पी एल ची बस सेवा अत्यंत महत्त्वाचे असून, महाराष्ट्र राज्यात महत्त्वाचे असणारे स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ बुद्रुक, त्याचप्रमाणे पुढे केंदूर मधील विविध धार्मिक मंदिरे, जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे, शंभू प्रेमी, विद्यार्थी, कामगार वर्ग, यांची खूपच गैरसोय झाली असून, पुणे नगर रोडवर देखील प्रवाशांची गैरसोय झाली आहे, त्यामुळे ही बस सेवा लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे,



