सासवड: प्रतिनिधी: बापु मुळीक
पिसे ( ता. पुरंदर )येथे १५ ऑगस्ट अमृत मोहत्सव निमीत्त फिल्टर मशीनचे उदघाटन उपसरपंच सीमा मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.
पिसे गाव येथील सर्व नागरिकांना पिण्याचे पाणी ५ रुपयात मिळणार असल्याची हि सर्व सुविधा पुरंदर तालुक्याचे आमदार संजय जगताप व विदयमान जिल्हा परिषद सदस्य दत्त झुरंगे यांच्या माध्यमातून फिल्टर मशीन मिळाल्याची माहिती सरपंच रोहन मुळीक यांनी दिली .
या वेळी सरपंच रोहन मुळीक,उपसरपंच सीमा मुळीक सदस्या दिलशाद सय्यद ,शोभा कुटे , गणेश सांगळे ,पंडित मुळीक माजी सरपंच गणेश मुळीक, माजी सरपंच दिपक मुळीक, ग्रामसेविका चांदगुडे , शिपाई विजय इंगळे, उधोगपती संतोष मुळीक,रमेश पांडुरंग मुळीक , पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष ,ज्येष्ठ नागरिक महिला युवक वर्ग विद्याथी ,विद्याथीनी ,शेतकरी बहुसंखेने उपस्थित होते.

