March 30, 2026
शिरूर विशेष प्रतिनिधी
      शिरूर तालुक्यातील  केंदूर गावच्या जडणघडणीमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे केंदूर गावचे माजी सरपंच आणि शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य बाबुराव (नाना) साकोरे यांच्या घरी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.  मंगळवार दिनांक १६ रोजी गावभेट दौऱ्यादरम्यान वळसे पाटील केंदुर येथे आले होते.

त्यांच्यासमवेत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्तजी निकम ,  शिरूर आंबेगाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाशबापु पवार ,शिरूर पंचायत समितीचे उपसभापती सविताताई पऱ्हाड, अमोल जगताप, प्रमोदशेठ पऱ्हाड व केंदूर गावचे सरपंच, उपसरपंच ,सर्व आजी माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित  होते.          

 यावेळी साकोरे परिवाराच्या वतीने  मा. सरपंच बाबुराव (नाना) मथुजी साकोरे व युवा नेते उमेश साकोरे यांच्या हस्ते वळसे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.