शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
पाबळ येथून सुमारे ६० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना रविवार (दि.२१ ऑगस्ट) रोजी रात्री १ ते पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली असून याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात चंद्रकांत यशवंत डोक (वय ५५ वर्षे, रा. पाबळ, आँईल मिलच्या पाठीमागे, ता.शिरूर जि.पुणे) यांनी फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी राहत असलेल्या घरासमोरून त्यांची स्वतःची काळया रंगाची होंडा कंपणीची दुचाकी (क्र. एमच १४ जेएस ८६५४) ही अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे. शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार चौधर पुढील तपास करत आहेत.

