March 30, 2026
गुनाट प्रतिनिधी : एकनाथ थोरात
       निर्वी (ता. शिरूर) येथे शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त साहित्य देऊन त्यांच्या शैक्षणिक विकासास प्रोत्साहन देण्याचे कार्य तसेच सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी रोटरी क्लबने टीच उपक्रमांतर्गत शिक्षक प्रशिक्षण ई- लर्निंग, प्रौढ शिक्षण, मुलांचा शैक्षणिक विकास आणि आनंदी शाळा असा पाच कलमी कार्यक्रम आखला आहे   

त्याचाच भाग म्हणून रोटरी क्लब  तर्फे निर्वी येथील श्री म्हसोबा शिक्षक प्रसारक मंडळ संचलित तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट व रोटरी क्लब ऑफ शिक्रापूर यांच्या संयुक्त विद्येमाने विद्यालयास शैक्षणिक व बौद्धिक सुविधांसाठी ८ लाख रुपयाची देणगी देऊन सहकार्य केले आहे. या कार्यक्रमाच्या वेळी मा.आमदार शिरूर व अध्यक्ष श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव म्हाळुंगी सूर्यकांत पलांडे हे अध्यक्षस्थानी होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रोट्रियन मोहन अंगडी पुणे वेस्ट, मा.अध्यक्ष शिक्रापूर रोटरी क्लब डॉ. मच्छिंद्र गायकवाड, सेक्रेटरी रोटरी क्लब शिक्रापूर डॉ. मिलिंद भोसुरे, विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी प्राचार्य संजय मांढरे सर, संतोष मराठे तसेच मा.आदर्श सरपंच तात्यासाहेब खंडेराव सोनवणे, नितीन मिसाळ व शिक्षक वृंद व कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्तावना विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती शोभा पवार तसेच सूत्रसंचालन विष्णू करपे सर सर्वात शेवटी सर्वांचे आभार सुधीर थोरात सर यांनी मानले.