शेल पिंपळगाव प्रतिनिधी बाप्पू गाडे पाटील
श्रावण महिन्याला हिंदू संस्कृतीमध्ये सर्वात चांगले महत्व आहे आणि या महिन्यात सर्व भाविक महादेवाची पूजा अभिषेक करतात. सोमवार (दिनांक 22 ऑगस्ट ) श्रीक्षेत्र बेली वडगाव घेनंद (तालुका खेड )इथे प्राचीन महादेवाचे मंदिर आहे .या महादेवाच्या प्राचीन मंदिरात श्रावण महिन्यात तिथे रोजच गर्दी असते पण आज शेवटचा सोमवार म्हणून भाविकांनी दर्शन साठी खूपच गर्दी केली होती,
तसेच खेड तालुक्यातील काळूस गावातील संगमवाडी येथील भीमा आणि भामाच्या संगमावरती संगमेश्वराचं पुरातन मंदिर आहे तेथेही श्रावण महिन्यात भाविकांची खूप गर्दी असते. आज चौथा आणि शेवटच्या सोमवार भाविकांनी संगमेश्वरावरती येऊन दर्शन घेतल तसेच शेलगाव मधील शैलेश्वराच्या मंदिरावरही भाविकांनी दर्शन घेतले, श्रावण महिन्यामध्ये हिंदू संस्कृती व रीती रिवाजा प्रमाणे, देवादिकाचा महिना मानला जातो, या महिन्यामध्ये ग्रंथवाचन, त्याचप्रमाणे पूजा पाठ याकडे जास्त लक्ष दिले जाते, आता सद्यस्थितीत श्रावण महिना संपत आला असून आजचा शेवटचा श्रावणी सोमवार आहे, त्यामुळे खेड तालुक्यामधील सर्व गावातील महादेव मंदिरामध्ये, भाविकांनी दर्शनासाठी रांग लावलेली होती,

