लोणी काळभोर अनिकेत मुळीक
लोणी काळभोर कदमवाक वस्ती (तालुका हवेली) येथे .. दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतं चालले आहे..जबाबदार कोण? रस्त्यावर थांबलेल्या गाड्या, प्रवाश्याची वाट बघत असलेल्या रिक्षा,बस स्टॉप, बेशिस्त वाहन चालक यांच्यावर कडक कारवाईची गरज.काय चालय काय हे… पोलिस स्टेशन लांब नाही,दवाखाना लांब नाही.आणि कोणाची मदत ही नाही..
लोणी स्टेशन येथून रोज हजारो नागरिक रेल्वे तुन प्रवास करतात.. रेल्वस्थानकापासून 100 मीटर अंतर असलेला रोड पुणे सोलापूर हायवे हा मृत्युला कारणी भूत ठरत आहे…. 🚦 सिग्नल ची व्यवस्था नाही…प्रशासन जागेवर नाही.आणि मृत्यू थांबत नाही..सिग्नल देता का कोणी सिग्नल अशी गत झाली आहे.
यासाठी मोर्चा काढावा लागतो…या सारखी लाजिरवाणी गोष्ट कुठली नाही…असा सर्व सामान्यांना पडणारा प्रश्न आहे….दवाखाना ओके, पोलिस ओके, प्रशासन ओके,काळे धंदे ओके..मग सिग्नल च का अंन ओके…लोणी काळभोर कदम वाक वस्ती आता एकही निष्पाप बळी सहन करणार नाही…सर्व सामान्यांनची मागणी पूर्ण करावीच लागेल….
खासदार साहेब तुम्हीच आता लक्ष घाला, लोणी काळभोर, कदम वाक वस्ती करांचा आक्रोश,


