सुनील भंडारे पाटील
छत्रपती शहाजीराजांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये, देशामध्ये मराठे व हिंदू धर्माच्या अस्तित्वासाठी छत्रपती घराणे खूप महत्त्वाचे समजले जाते,
या घराण्यामधील सातारच्या गादीवरील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे वंशज श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आज पुण्यातील एका खाजगी( जहांगीर हॉस्पिटल ) रुग्णालयात, उपचारादरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले, त्यांचे पार्थिव रात्री उशिरा सातारा येथील अदालत वाड्यात आणणार असून, अंत्यसंस्कार उद्या बुधवार ता 14 रोजी होणार आहे, छत्रपती स्वराज्यातील आणखी एक दिवा मालवला, उदयनराजे भोसले, व शिवेंद्रराजे भोसले यांचे ते काका होते,

