काल मंगळवार दिनांक 27 रोजी सायंकाळी 7:00 वाजता बजरंगवाडी येथील अपेक्षा युवराज साळुंखे वय सात वर्ष ही मुलगी हरवल्याची तक्रार तिच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिली होती, ही खळबळजनक घटना घडल्यानंतर शिक्रापूर पोलिसांना या घटनेचा उलगाडा करणे चॅलेंज होते, तपासाची सूत्रे तातडीने हलली, पोलिसांनी संशयित म्हणून मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतले, अतिशय खडतर या तपासामध्ये मुलीच्या वडिलांनी अखेर जाब दिला, की काल सायंकाळी सात वाजता अपेक्षा हिला तिचे वडील युवराज साळुंखे यांनीच वेळ नदीच्या वाहत्या पाण्यात फेकून देऊन खून केल्याचे अखेर कबूल केले, जन्म देणारा बापच एवढे भयान कृत्य करू शकतो, या घटनेत बापच वैरी ठरला आहे,
दरम्यानच्या काळात अपेक्षाचे हरण झाले की काय या प्रश्नाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती, लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते अखेर शिक्रापूर पोलिसांनी या घटनेचा छडा लावला,


