March 30, 2026
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले 
         सणसवाडी (ता शिरूर) येथे व शिक्रापुर तळेगाव करंडी पिंपळे परिसरात दुपारी साडेतिनच्या सुमारासढगफुटी सदृश्य पाऊस सुरु होऊ दिड तास धुव्वाधार पाउस बरसला आणी ओढ्या नाल्यांना जोराचा पुर आला .      

सणसवाडीत यावर्षी ही दुसऱ्यांदा ढगफुटी होऊन सणसवाडीत जाणारा ओढ्यांवरील रस्ता पुलावरून व रस्त्यावर डोक्या इतके पाणी वाढून तासभर रस्ता बंद होता . थोडेसे पाणी उतरता पिकप टाटा एसी गाड्यांवाले जिव धोक्यात घालून पाण्यातून वाट काढत होते . जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना थांबवत धोका पत्करून पुढे पाण्यातून न जाण्याचे आवाहन सामाजीक कार्यकर्ते बाळासो सैद करत होते तरीही बराच वेळ रोड बंद असल्याने नागरीक पाण्यातून वाट काढत होते . सखल भागातील ओढ्या कडेच्या व रस्त्या कडेच्या खोल्यांनी पाणी शिरल्याचे पोलीस पाटील विठ्ठल वळसे यांनी सांगीतले .