शासकीय चित्रकला परीक्षा एलिमेंट्री ही २८ सप्टेंबर व २९ सप्टेंबर या दोन दिवसात व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा ३९ सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहेत. स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशाला या परीक्षा केंद्रावर इलेमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी ४६७ व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी एकूण २३५ असे एकूण ७०२ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. तळेगाव पंचक्रोशीतील जवळपास नऊ शाळेतील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतलेला आहे. कोरोना नंतरच्या दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. याप्रसंगी शिरूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर तसेच विषय तज्ञ प्रदीप देवकाते व चव्हाण मॅडम यांनी परीक्षा केंद्राला भेट दिली. या परीक्षा केंद्रावर श्री छत्रपती संभाजी महाराज हायस्कूल कोरेगाव भीमा, महाराजा सयाजी गायकवाड हायस्कूल पिंपळे जगताप, विद्या विकास मंदिर करंदी ,विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी, श्रीमती बबईताई टाकळकर माध्यमिक आश्रम शाळा निमगाव म्हाळुंगी, श्री पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी, ज्ञानवर्धिनी विद्यालय तळेगाव ढमढेरे, माध्यमिक विद्यालय सणसवाडी, सौ हिराबाई गोपाळराव गायकवाड हायस्कूल कासारी आदी शाळांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी सहभाग घेतलेला आहे. या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेचे सर्व नियोजन प्रशालेचे कलाशिक्षक अविनाश कुंभार व कलाशिक्षिका सोनाली हिले यांनी केले. परीक्षेसाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्याध्यापिका सुनिता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा व सदिच्छा दिल्या. तसेच स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत आलेल्या पंचक्रोशीतील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते ,मानद सचिव अरविंद ढमढेरे ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे आदींनी शुभेच्छा दिल्या.

