सुनील भंडारे पाटील
पुण्यातील वाघोली येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मोझे कॉलेज रस्ता येथील सोलासीय सोसायटीच्या चेंबर मध्ये कर्मचारी काम करताना अडकून तीन कामगारांचा मृत्यू.
पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी तिघांना काढले बाहेर . वाघोली येथील बाय रोडवरील सोलासीय सोसायटीमध्ये मधील चेंबरमध्ये काम करणाऱ्या नितीन प्रभाकर गोड (वय ४५ वर्षे), गणेश भालेराव (वय २८ वर्षे), सतीशकुमार चौधरी (वय ३५वर्षे) रा:वाघोली तिघांचा काम करत असाल असताना चेंबर मध्येच गुदमरून मृत्यू झाला असल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे, या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण तयार झाले आहे,
फायर ब्रिगेडचे विजय महाजन अक्षय बागल मयूर गोसावी चेतन समशे तेजस सागरे नितीन माने संदीप शेळके अभिजीत दराडे विकास पालवे यांच्या टीमने त्यांचा शोध घेतला, असून तिघांना चेंबर मधून बाहेर काढण्यास आले आहे. घटनास्थळी लोणीकंद पोलिसांचे पथकही दाखल झाले आहे,

