March 30, 2026
शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
             न्हावरे (ता.शिरुर) येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयात दीपावलीच्या सणानिमित्त विद्यार्थ्यानी बनविलेल्या आकाश कंदील व विविध कलाकृतीच्या प्रदर्शनाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात सुमारे ६०० विद्यार्थी सहभागी झाले होते,       

विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मि॓ळावा व विद्यार्थ्यांमध्ये असलेली उपजत कौशल्ये विकसित व्हावीत या हेतूने विद्यालयाचे प्राचार्य डॉ. शाहीद शेख, पर्यवेक्षक संजय चव्हाण व सर्व वर्गशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध रंगाचे आकाश कंदील, दिपावली भेटवस्तू, दिपावली शुभेच्छा पत्र, विविध रंगाच्या आकर्षक पणत्या, भेटकार्ड, कागदी रंगीबेरंगी पुष्पगुच्छ  आदी विविध आकर्षक कलाकृती विद्यार्थ्यानी बनविल्या होत्या. यामध्ये  पाचवी ते आठवी च्या  कार्यानुभव विषया अंतर्गत  हा विशेष उपक्रम संबधित शिक्षकांनी विद्यार्थ्याकडून राबवून घेतल्याने पालकांमधून व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. सर्वच विद्यार्थी अतिशय उत्साहात व उत्स्फूर्तपणे या प्रदर्शनात सहभागी झाले होते. इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करून अगदी माफक खर्चात आणि कमी वेळेत विद्यार्थ्यांनी आकर्षक आकाश कंदील बनविले. विद्यार्थ्यांच्या कलाकुसरीच्या या प्रदर्शनास ग्रामस्थ व पालकांनीही भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.