March 30, 2026
 सणसवाडी प्रतिनिधी 
         कान्हूर मेसाई (ता शिरूर) येथे शिरूर तालुकास्तरीय आंतरशालेय मुले व मुलिंचे कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन भिमाशंकर स . साखर कारखान्याचे  व्हा चेअरमन प्रदिप वळसे पाटील , जि.प सदस्या स्वाती पाचुंदकर, माजी सभापती विश्वास आबा कोहकडे, विक्रमविर पै. सुभाष उमाप , विद्याधामचे अध्यक्ष गंगाधर पुंडे माजी अध्यक्ष भास्कर पुंडे , सदाशिव पुडे , क्रिडा प्रशिक्षक झेंडू पवार, शरद दुर्गे, सरपंच चंद्रभागा खर्डे , उपसरपंच सोपान पुंडे , माजी सरपंच बंडू पुंडे , दादासो खर्डे , नलिनी खर्डे , सुधिर पुंडे , विद्याधामचे सचिव सुदाम तळोले , संचालक राजेंद्र ननवरे,तानाजी खर्डे , रोहिदास ढगे, संकटमोचक शहाजी दळवी, दिपक तळोले , बाबुराव दळवी , मोहन पुंडे , विजय घोलप, आबिद तांबोळी , संदिप तांबे, पै. भैय्या खर्डे , कारभारी पुंडे , नवनाथ पुंडे , राहुल नाणेकर , प्रा . अशोक शिंदे , मा चेअरमन भाऊसो तळोले , कुस्ती पंच काळुराम लोखंडे , सचिन आव्हाळे, क्रिडा पदक विजेत्या शैला धुमाळ , शिरूर केसरी पै.राहूल हरगुडे ,ग्रामस्थ , युवा कार्यकर्ते , शिक्षक व विद्यार्थी उपस्थीत होते .  

मान्यवरांना ओवाळून व स्वागत गिताने स्पर्धेला सुरुवात झाली . छत्रपती शिवरायाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करून दिप प्रज्वलन करणेत आले .  प्रा . अनिल शिंदे यांनी समाजाचे शिक्षण क्षेत्राकडे लक्ष कमी असून कोरोनाकाळात लोकांनी मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने केली शाळांसाठी नाही . तसे ग्रामस्थांचे शाळेला सहकार्य असलेने बरीचशी कामे होत आहेत , शाळेच्या कमानीसाठी भिमाशंकर कारखान्यातर्फे निधी मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली , ती प्रदिप वळसे यांनी मान्य केली . यावेळी शरद दुर्गे, विश्वास कोहकडे , स्वातीताई पाचुंदकर , पै. सुभाष उमाप यांनीही विचार मांडले . मान्यवरांचे हस्ते प्रथम कुस्ती महाराष्ट्र केसरी रघूनाथ पवार यांचे सुपुत्र शिरूर हायस्कूलचे पवन पवार व मांडवगणचे अभिजीत फराटे व अथर्व चव्हाण व साहिल शिंदे यांची कुस्ती लावणेत आली . त्यानंतर ज्ञानेश्वरी खैरे या मुलीची विकास झेंडे या मुलीसी प्रेक्षणीय कुस्ती झाली . तालुक्यातील ३० हायस्कूलच्या ११० जणांची स्पर्धेत नाव नोंदणी झाली असून उद्या मुलीच्या कुस्त्या होणार आहेत . यावेळी खेळात राष्ट्रीय स्तरावर पदक मिळविलेल्या शैला बंडोबा धुमाळ हिचा स्वाती पाचुंद कर यांचे हस्ते सत्कार करणेत आला .चव्हाण सरांनी उत्कृष्ट सुत्रसंचलन केले . युवापिढीला बलशाली करणाऱ्या या कुस्ती स्पर्धा आयोजनाचे उपस्थीतांनी कौतुक केले .