March 30, 2026
सुनील भंडारे पाटील 
        कुठल्याही महिलांवर अत्याचार झाल्यास तो कदापि सहन केला जाणार नाही त्यासाठी  महिलांनी देखील स्वतः सक्षम  बनण्याची गरज आहे असे प्रतिपादन तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले शिक्रापूर (ता. शिरूर) येथील भूमाता ब्रिगेड आणि फाउंडेशनच्या शिरूर तालुका मुख्य कार्यालय तालुका अध्येक्ष मंगल सासवडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालवल्या जाणाऱ्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

    यावेळी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई, जिल्हा परिषद सदस्य कुसुम मांढरे, शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, ऊर्जा उद्योग समूहाचे प्रकाश कुतवळ, भूमता ब्रिगेडच्या शिरूर तालुका अध्यक्ष मंगल सासवडे,बाजार समिती माजी संचालक दत्तात्रेय हरगुडे, माजी  सदस्य पी. के. गव्हाणे,  उद्योजक सतीश सासवडे, मानव विकास परिषदेचे संदीप कुटे, महाराष्ट्र कुटुंब सल्लागार मीना गवारे,उद्योजक अरुण गायकवाड, गणेश बाफना, संदीप कुटे कल्पना चव्हाण, हर्षल पाटील, विशाल पाटील, अनिल बत्ते, अमित साळुंखे,  संगीता तावरे, रीना सोनावणे, रमा आठवले,कल्पना ढोकले, ललिता पोळ, अनिता हरगुडे, भाग्यश्री जाधव,सिमा भावसार, छाया कळमकर, भाग्यश्री जाधव, अनिता हरगुडे , सुमित्रा सासवडे, सिमा सासवडे,सुरेखा इंगळे, वैशाली खेडकर,आदी मान्यवर उपस्तित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  पोपट इंगवले सर यांनी केले, 

    महिलांनी समाजामध्ये सामाजिक काम करत असताना गरजू महिलांना बचतगट अथवा संघटनांच्या माध्यमातून रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करावेत असे ऊर्जा उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रकाश कुतवळ यांनी सांगितले. 

          शिरूर तालुक्यामध्ये महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून शिरूर तालुक्याच्या अध्येक्ष पदाच्या माध्यमातून चांगली सुरवात केल्याबद्दल भूमाता ब्रिगेडच्या अध्येक्ष  तृप्ती देसाई यांनी मंगल सासवडे  व त्यांचे पती उद्योजक सतीश सासवडे यांचा तर समन्वयक म्हणून भूमिका बजवल्याबद्दल पत्रकार प्रमोद कुतवळ यांचा सन्मान केला.