समाजात सर्वच स्तरांमध्ये भगवान श्रीराम यांचे विषयीचे प्रेम वाढत चालले असून, देशाची अस्मिता असणाऱ्या रामायण कालीन भगवान श्रीराम मंदिराची उभारणी सद्यस्थितीत आयोध्या मध्ये वेगाने चालू आहे, त्यातच आज श्रीराम नवमीचा दिवस, म्हणजे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यामध्ये सर्वांचा सहभाग होता, पुणे जिल्ह्यामधील शहराबरोबर ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये श्रीराम मंदिरामध्ये आज सकाळपासून भजन,कीर्तन चालू होते, दुपारी 12:00 वाजता प्रत्येक ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव साजरा करून, सजवलेल्या पाळण्याला झोका देत सुवासिनींनी पाळणा गायला, यावेळी फुलांचा वर्षाव करण्यात आला, खोबरे, शेंगदाणे साखर या प्रसादा बरोबर, महाप्रसाद ठेवण्यात आला होता, ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये आज भजन व कीर्तनाचा निनाद कानावर येत होता, बऱ्याच ठिकाणी सायंकाळी श्रीराम नवमीची शोभायात्रा काढण्यात आली होती,

