सुनील भंडारे पाटील
कान्हूर मेसाई (तालुका शिरूर) येथे श्री राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे, गावातील श्रीराम जन्मोत्सव समिती व समस्त ग्रामस्थ कान्हूरमेसाई च्या वतिने रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी प्रभुरामचंद्राचा जल आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दुपारी ठिक १२ वा १० मीनिटांनी श्रीराम जन्म झाला. त्यानंतर महाआरती करण्यात आली. भक्तिमय वातावरणात प्रभू श्रीरामाचा जय जयकार करत गावातून ढोल पथकाच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. तसेच सायंकाळी ह.भ.प पवन महाराज चोथे यांचे सुश्राव्य असे हरी कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला . यावेळी रामनवमीच्या निमित्ताने आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले , अशी माहीती समिती चे अध्यक्ष अँडव्होकेट तुकाराम पुंडे यांनी दिली, यावेळी महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

