संबंधित महामार्गाचे गेल्या काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण झाल्यानंतर वाहनांचा खूपच वेग वाढला आहे, वाहतुकीच्या सर्व नियमांचे उल्लंघन करत सुसाट पणे वाहने धावत आहेत, येरवड्यापासून शिरूर पर्यंत महामार्ग लगत अनेक गावे ऐतिहासिक काळापासून स्थित आहेत, गावच्या ठिकाणी तसेच इतर जोडले गेलेल्या गावांचे फाटे, या ठिकाणी वाहतुकीची सुव्यवस्था नसल्याने अशा ठिकाणी किरकोळ अपघात वगळता आता मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे, अपघातात शरीराच्या चिंधड्या होणे किंवा गंभीर जखमी होणे असे स्वरूप मिळत आहे, नोटबंदी, कोरोना लॉकडाऊन मुळे लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय ढासळलेली असून गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना वाचवण्यापेक्षा संबंधित खाजगी रुग्णालयांचा खर्च कसा करायचा या मानसिक ताण-तणावाखाली रुग्णांच्या नातेवाईकांना परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे, खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून शासकीय आरोग्य विभागाने लुटा लुट एक बाजार मांडला आहे असे चित्र सध्या या भागात तयार झाले आहे, रुग्णांकडून एका दिवसात लाखो रुपयांची लूट केली जात आहे,

