March 30, 2026
हवेली प्रतिनिधी 
       येरवडा येथे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांचे तर्फे वाहतूक नियमांचे उल्लंघना संदर्भात असलेले प्रलंबित वाहन केसेसचा निपटारा करणे करीता पोलीस उप आयुक्त वाहतूक शाखा कार्यालय, बंगला नं. ६. येरवडा पोस्ट ऑफिस शेजारी, पुणे येथे दि.०९/१२/२०२३ रोजी सदर लोक अदालतीचे अनुषंगाने दिनांक २१/११/२०२३ रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या ठिकाणी के. पी. नांदेडकर, जिल्हा न्यायाधिश १, पुणे व प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधिश प श्रीमती सोनल पाटील, सचिव, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शिवाजीनगर, पुणे यांचे समवेत बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार दि. २२/११/२०२३ रोजीपासून वाहतूक शाखा कार्यालला नं. ६, येरवडा पोस्ट ऑफिस शेजारी, पुणे येथे प्रलंबित वाहतूक चलनांचे  दंडातील तडजोड बाबतच्या माहितीचा मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे संकल्पनेतून व मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर याच्या मार्गदशनाखाली नागरिकांना ‘जिल्हा हेल्प डेस्क‘ ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे .

        लोकहितासाठी व प्रलंबित खटला निकाली काढण्यासाठी ज्या वाहनांवर वाहतूक नियमभंग केलेल्या बाबत केसेस प्रलंबित आहेत, अशा वाहनचालक मालक यांनी दि. २२/११/२०२३ रोजी पासून सकाळी ११.०० ते १४.०० व १५.०० ते १७ नीस उपआयुक्त वाहतूक शाखा कार्यालय, येरवडा पुणे येथे येवून आपले वाहनावर असलेले दंडाची रक्कम तडजोडीनं वाहन व चालकांवरील दंड चलान कमी होईल तसेच तडजोड करून सूट देवून खटला निलंबीत करण्यात येणार आहे . तसेच नऊ डिसेंबरला न्यायालयाकडुन वाहतूक शाखेव्दारे मोठया प्रमाणात लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पुणे शहर पोलीस वाहतुक विभागाकडून करण्यात आले आहे,