वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरुणास आळंदी जवळील केळगाव मधून अटक पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय विशेष पथकाची कारवाई
आळंदी प्रतिनिधी आरिफभाई शेख
आळंदी/पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आळंदी जवळील केळगाव या गावी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया च्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदे अंतर्गत असणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विशेष पथकाने कारवाई करत एका तरुणास अटक केली आहे.
सदर तरुणाचं नाव बसवराज बिरादार (वय 36) असून दोन पीडीत महिलांची सुटका करण्यात आलेली आहे स्वतःच्या अर्थमर्जनासाठी सदर तरुण हा व्यवसाय केळगाव या ठिकाणी करत होता त्याबाबत पोलिसांना माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकत मुद्देमालासहित सदर तरुणाला अटक केलेले आहे अटक करतेवेळी सदर तरुणाच्या जवळ सात हजार पाचशे रुपयांची रोकड रक्कम मुद्देमाल म्हणून जप्त करण्यात आलेले आहे बसवराज शुभन्ना बिरादार (वय 36) राहणार केळगाव तालुका खेड जिल्हा पुणे या इसमास मुद्देमालासह अटक करण्यात आलेली असून आळंदी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर बाबत आळंदी पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे,
