येवती वाशीयांचा ५० वर्षापासूनचा पाणी प्रश्न कायम मिटला
नराशाम महाराज यांच्या हस्ते जलजीवन पाण्याच्या टाकीचे भुमिपुजन संपन्न !
संताची भुमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सद्गुरू नराशाम महाराज तिर्थक्षेत्र येवती येथे गेल्या पन्नास वर्षांपासुन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत होती तरी कायम स्वरुपी पाणी प्रश्न अद्याप मिटलेला नव्हता.येवती गावाला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी अशी मागणी नागरिकांकडून अनेक वर्षांपासून केली जात होती. पण येवती ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून डॉ.उमेश पाटील यांची एकहाती सत्ता येतांच आमदार डॉ.तुषार राठोड व सरपंच डॉ.उमेश पाटील यांच्या अथक प्रयत्नातुन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ” हर घर जल , हर घर नल ” , या अभियानाद्वारे येवती येथे जलजीवन मिशन अंतर्गत विहीरीचे खोदकाम पुर्ण झाले तर काही पाईप लाईन चे काम सुद्धा प्रगतीपथावर आहे.
येवती ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या लोकातांडा येथे दोन टाकीचे तर पळसवाडी व रत्नातांडा येथे नळ योजनेच्या टाकीचे काम पुर्ण झाले आहे. तर आज येवती येथे दि. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजुच्या जागेवर श्री सद्गुरू नराशाम महाराज यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे भुमिपुजन करण्यात आले असून यावेळी गावचे सरपंच डॉ. उमेश पाटील उपसरपंच बालाजी नागरगोजे, सह सर्व ग्राम पंचायत सदस्य, व इतर गावांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. येवती गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता कायमचा मिटल्याने नागरिकांच्या व विशेष महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
