सुनील भंडारे पाटील
श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथे सालाबाद प्रमाणे श्री धर्मवीर संभाजी महाराज समाधी स्थळावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री धर्मवीर संभाजीराजे युवा मंच, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृति समिती व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी परिसरात ५००० पणत्या लावून तसेच विद्युत रोषणाई फटाक्यांची आतिषबाजी व आकर्षक अश्या रांगोळीमधे राम मंदिर प्रतिमा साकारून सजावट करत त्रिपुरारी पौर्णिमा उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.
प्राची अवसरे या चिमुकलीने पोवाडा सादर करत ग्रामस्थांची मने जिंकली.ध्येयमंत्र घेऊन कार्यक्रमाची सुरुवात आणि प्रेरणा मंत्र घेऊन कार्यक्रमाचे सांगता करण्यात आले.या वेळी युवा मंच अध्यक्ष अनिल भंडारे ,समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे,वैभव पवार,गावातील महिला मंडळी सह ग्रामस्थ उपस्थित होते. वढू बुद्रुक ग्रामस्थ तसेच पंचक्रोशी मधून लोकांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतला होता, गेल्या अनेक वर्षांपासून समाधी स्थळी ही परंपरा कायम असून लहान,थोर आबाल, वृद्ध, तरुण, तसेच महिला या दीपोत्सवामध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतात, त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी समाधीस्थळावर सुमारे 5000 दिवे लावल्याने परिसर लखलखत्या तारेंसारखा चमकू लागला होता, शंभू भक्तिमय वातावरण तयार झाले होते,
