March 30, 2026
सणसवाडी प्रतिनिधी
      सणसवाडी (तालुका शिरूर) येथील स्वामी समर्थ सेवाकेंद्रात विविध अध्यात्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले . पौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांच्या दुर्गा रुपी प्रतिमेचे पूजन सुवासिनींच्या हस्ते करून दुर्गा सप्तशती पाठ वाचन करण्यात आले .    

 यामध्ये पाचशेवर भाविकांनी पाठपठन केले .परमपूज्य अण्णासाहेब मोरे गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली सणसवाडी येथे स्वामी समर्थ केंद्र २० % आध्यात्म व 80 टक्के पारमार्थिक समाजसेवा उपक्रम राबवले जातात .केंद्राच्या उभारणीसाठी अनेक दानशुरांनी मदत केली असून दर गुरवारी व रविवारी सायंकाळी ६ वाजता येथे भावीक जमून नैवद पुजा पाठ प्रवचन होते . विचारांची देवाण घेवाण व समस्यांचे निराकरण केले जाते .

बालसंस्कार ,युवा प्रबोधन स्वयंरोजगार ,पर्यावरण, कायदेविषयक विविध समस्यावर मार्गदर्शन केले जाते .त्यासाठी अशोक ढेकळे, अरुण हिरे, रवी यादव, दीपक पानसरे , गुलाब   भोसुरे व शंभरावर महिला भगिनींचे विशेष योगदान असते . कार्यकमा नंतर आरती व महाप्रासादाचे आयोजन होते . गतवर्षी २५० भावीक भक्तांना नाशिक त्र्यंबकेश्वर येथे अध्यात्मिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते .वर्षभरातील सर्व सण उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात . अशोक ढेकळे यांनी उपस्थीत भावीक जनांचे स्वागत केले . सामाजिक प्रदूषण हटवून सुसंस्कारीत नवपिढी उभारणी साठी या स्वामी समर्थ सेवा केंद्राचे माध्यमातून कार्यरत होवूया असे आभार प्रदर्शन करताना अरुण हिरे यांनी सांगीतले .