March 30, 2026
हवेली प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटेकर 
       वारकरी सांप्रदायाला विश्वरूप प्राप्त करून देणारे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक राष्ट्रसंत संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे यंदाचे हे ७५३ वे जयंती वर्षी असून ६७३ वे समाधी वर्ष आहे त्यानिमित्ताने संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या  जीवन चरित्रावर विशेष मार्गदर्शन,   

    तसेच शिरूर तालुक्यातील युवक समाज बांधवांना एकत्र करून चर्चा सत्राचे भव्य आयोजन नामदेव शिंपी समाज युवक संघ शिरूर तालुका यांच्यावतीने रविवार दिनांक ४.. ६..2023 रोजी दुपारी चार वाजता संत शिरोमणी नामदेव महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिर मेन रोड बाजार पेठ तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथे पंढरपूर येथील संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे थेट सतरावे वंशज ह भ प निवृत्ती महाराज माधव नामदास 

हे कार्यक्रमाचे मुख्य वक्ते व मार्गदर्शक असून या निमित्ताने सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त नामदेव शिंपी समाज युवक संघ शिरूर तालुका, महिला मंडळ गणेशोत्सव मंडळ, सुधीर भाऊ ढमढेरे युवा मंच तसेच सर्व युवक बांधव तळेगाव ढमढेरे यांच्या वतीने करण्यात आले आहे .