March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
              पुणे नगर महामार्गावर वाघोली ते शिरूर पर्यंत सर्व गावांमध्ये प्रवाशांना प्रचंड वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत आहे, याबाबतीत संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाले असून प्रवाशांना मात्र नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे,           

 संबंधित रस्त्याचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे, परंतु वाहतुकीच्या विविध प्रकारच्या समस्यांमुळे तसेच बेशिस्त वाहन चालक यांच्यामुळे पुणे नगर महामार्गावर सतत वाहतुकीची कोंडी होत आहे, या मार्गावर वाघोली, बी जे एस कॉलेज चौक, आळंदी फाटा चौक, पेरणे फाटा चौक, कोरेगाव भीमा, डिग्रज वाडी फाटा चौक, वाडेगाव फाटा चौक, कल्याणी फोर्ज चौक, सणसवाडी, एल अँड टी फाटा चौक, शिक्रापूर, मलठण फाटा, रांजणगाव गणपती, कारेगाव, न्हावरा फाटा, या ठिकाणी रोज सायंकाळच्या सुमारास सतत वाहतुकीची प्रचंड कोंडी झालेली आपल्याला दिसत आहे,

महामार्गावर बेशिस्त वाहन चालक, ठिक ठिकाणच्या चौकामध्ये सिग्नलचा अभाव, वाहतूक नियंत्रण पोलीस यंत्रणा नाही,रस्त्यावर गाड्या पार्किंग, रस्त्यात अचानक आडवी तिडवी गाडी घुसणे, रॉंग साईडचा वापर, यामुळे सरळ वाहतुकीला अडचण आल्याने या मार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे,