शिरूर विशेष प्रतिनिधी
टाकळी हाजी (तालुका शिरूर) येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक रोहिदास अर्जुन सोदक यांची जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी गावडे म्हणाले की, शिक्षकांना पेन्शन मिळविण्यासाठी ही संघटना काम करत असते,शिक्षकांच्या मदतीसाठी सोदक नेहमी अग्रभागी असतात आणि म्हणूनच जिल्ह्याची मोठी जबाबदारी सोदक यांच्याकडे संघटनेनी दिली आहे,या संधीचे नक्कीच सोने करतील आणि शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावतील यात तिळमात्र शंका नाही.
यावेळी सुरेश सोदक, सुनिल थोरात,अर्जुन सोदक,देविदास पवार,शहाजी सोदक,संभाजी घोडे,स्वप्निल गावडे,संपत सोदक,भाऊसाहेब घोडे,गोविंद गावडे,दगडू गावडे,अरुण सोदक,सनी सोदक उपस्थित होते.

