March 30, 2026
कै, शंकर (तात्या) गणपती भंडारे( वय 101)

सुनील भंडारे पाटील
         वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील जुन्या पिढीचे शंकर( तात्या) गणपती भंडारे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, जुन्या पिढीची त्यांची कारकीर्द उल्लेखनीय होती, गावामधील 5 पंचा मध्ये त्यांचे नाव होते, 50 ते 60 वर्षांपूर्वी, गावामध्ये आत्ता निधन पावलेले शंकरतात्या भंडारे, त्याचप्रमाणे बाळ पाटील,काळ पाटील, आनंदराव कारभारी, कारभारी नाना, सखानाना, तुकाभाऊ, डीडी आमदार असे पंच होते, त्यांच्या शब्दाला गावामध्ये किंमत होती, ही लोकं चावडीच्या ओट्यावर बसून गावातील भांडण वाद-विवाद गावातली गावात मिटवायची, या पाच पंचांमधील शेवटचा मोहरा हरपला, त्यांचे पश्चात तीन मुले, दोन मुली, नातवंडे पतवंडे असा परिवार आहे, आजही लोक म्हणतात जुन्या पिढीचे आयुर्मान जास्त होते, कारण गावरान अन्न, शुद्ध हवा पाणी, यामुळे जुनी लोकं जास्त जगायची, या आजोबांनी देखील वयाचे शतक पूर्ण केले, वयाच्या 101 व्या वर्षी  त्यांचे निधन झाले,