शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशाला ते नगर रोड दरम्यानच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
शिक्रापूर येथील या रस्त्याची दुरावस्था झाल्याने व खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने रस्त्यावर डबकी साचली आहेत. संबंधित रस्ता मोठी रहदारी, लोकांचा सतत वावर अशा ठिकाणी असल्याने, तसेच रस्ता खड्ड्यात आहे की खड्डा रस्त्यात आहे, हे समजत नाही, लोकांना व ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी खूप कसरत करावी लागते,
तसेच रस्त्याच्या दुर्दशामुळे लहान मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे, पावसाळ्यात तर लोकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे, खड्डा चुकवताना शाळेत येणाऱ्या – जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून कसरत करावी लागत आहे. तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.


